फक्त पंतचेच नाही तर 'या' खेळाडूंच्याही आयपीएल पुनरागमनाची उत्सुकता

अनिरुद्ध संकपाळ

ऋषभ पंत

पंतचा 2022 च्या डिसेंबर महिन्यात अपघात झाला होता. त्यानंतर तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. आता तो आयपीएल 2024 द्वारे व्यावसायिक क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे.

मिचेल स्टार्क

ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क 9 वर्षानंतर आयपीएलचा हंगाम खेळणार आहे. त्याने शेवटचा आयपीएल सामना 2015 मध्ये खेळला होता. तो आता पुन्हा आयपीएलमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे.

श्रेयस अय्यर

केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर हा पाठदुखीमुळे 2023 चा आयपीएल हंगाम खेळला नव्हता. मात्र आता तो फिट झाला असून आयपीएल हंगामात तो केकेआरचे नेतृत्व करणार आहे.

पॅट कमिन्स

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स देखील आयपीएल 2024 मध्ये पुनरागमन करणार आहे. तो सनराईजर्स हैदराबादकडून खेळले. फ्रेंचायजीने त्याला यंदाच्या हंगामासाठी कर्णधार देखील केलं आहे.

जसप्रीत बुमराह

गेल्या हंगामात जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. मात्र आता तो 2024 च्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सकडून पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

शेवटच्या षटकावर विश्वासच बसत नाही... WPL फायनल गाठणारी स्मृती असं का म्हणाली?