Pranali Kodre
आयपीएल २०२५ स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. या स्पर्धेत आत्तापर्यंत अनेक युवा खेळाडूंनी प्रतिभा दाखवली आहे.
पण असे काही खेळाडू आहेत, ज्यांना कोट्यवधी रुपयांना खरेदी केले, पण त्यांना आत्तापर्यंत आयपीएलमध्ये फार काही करता आलेलं नाही. अशा खेळाडूंबद्दल जाणून घेऊ
मोहम्मद शमीला १० कोटी रुपयांना सनरायझर्स हैदराबादने खरेदी केले आहे. पण त्याला ९ सामन्यांत फक्त ६ विकेट्सच घेता आल्या आहेत.
लियाम लिव्हिंगस्टोनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ८.७५ कोटी रुपयांना खरेदी केले. पण त्याला ८७ धावाच करता आल्या आहेत आणि २ विकेट्स घेता आल्या आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स संघाने वेंकटेश अय्यरला २३.७५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. मात्र त्याला या हंगामात एका अर्धशतकासह १४२ धावाच करता आल्या आहेत.
रिंकू सिंगला कोलकाता नाईट रायडर्सने १३ कोटी रुपयांना रिटेन केले आहे. त्याने ११ सामन्यांत १८८ धावाच केल्या आहेत.
आंद्रे रसेलला कोलकाता नाईट रायडर्सने १२ कोटी रुपयांना रिटेन केले आहे. पण त्याने ११ सामन्यांत १२९ धावा केल्या आहेत आणि ८ विकेट्स घेतल्या आहेत.
रवींद्र जडेजाला चेन्नई सुपर किंग्सने १८ कोटी रुपयांना रिटेन केले आहे.मात्र जडेजाला ११ सामन्यांत २६० धावा केल्या आहेत आणि ७ विकेट्सच घेतल्या आहेत.
रिषभ पंत हा आयपीएलचा इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला लखनौ सुपर जायंट्सने २७ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. पण त्याला ११ सामन्यांत १२८ धावा केल्या आहेत.