Aarti Badade
काजू कतली, बर्फी आणि पेढ्यांवर चमकणारा चांदीचा वर्ख पाहून तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, हा नेमका तयार कसा होतो?
Silver Leaf on Sweets
Sakal
पूर्वी शुद्ध चांदीचे छोटे तुकडे प्राण्यांच्या आतड्यांपासून तयार केलेल्या पातळ आवरणांमध्ये ठेवून हातोड्याने तासन्तास ठोकले जात असत.
Silver Leaf on Sweets
सतत हातोडीने ठोकल्यामुळे चांदीचा थर अत्यंत पातळ आणि पारदर्शक बनतो, ज्याला आपण चांदीचा वर्ख म्हणतो.
Sweets
ESakal
आधुनिक काळात चांदीचा वर्ख तयार करण्यासाठी यंत्रांचा वापर केला जातो आणि अनेक उत्पादक प्राण्यांच्या आवरणांऐवजी कृत्रिम शीट्स वापरतात.
Sweets
ESakal
जुन्या पद्धतीत प्राण्यांच्या अवयवांचा वापर होत असल्याने तो वर्ख शाकाहारी नव्हता, मात्र आधुनिक पद्धतीने तयार केलेला वर्ख शाकाहारी असू शकतो.
मिठाईच्या पाकिटावर असलेले शाकाहारी प्रमाणपत्र किंवा हिरवे चिन्ह तपासा आणि स्थानिक दुकानातून मिठाई घेताना वर्ख तयार करण्याच्या पद्धतीबद्दल दुकानदाराला विचारा.
Sweets
अन्नासाठी वापरली जाणारी शुद्ध चांदी निर्धारित अन्नसुरक्षा नियमांनुसार तयार केलेली आणि मान्यताप्राप्त असणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे प्रमाणित वर्ख असलेली मिठाईच निवडा.
Chanakya Niti
Sakal