इस्रोच्या 'पुष्पक विमानाचा' फायदा काय?

Sudesh

इस्रो

भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रोने आज एक मोठी कामगिरी पार पाडली. इस्रोने आपल्या 'पुष्पक' या रीयूजेबल लाँच व्हीकलची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली.

ISRO Pushpak Viman | eSakal

चाचणी

कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे असणाऱ्या एअरोनॉटिकल टेस्ट रेंजमध्ये सकाळी 7:10 च्या सुमारास पुष्पकचं यशस्वी लँडिंग झालं.

ISRO Pushpak Viman | eSakal

लँडिंग

पुष्पक विमान पूर्णपणे स्वयंचलितपणे रनवेवर लँड झालं. पॅराशूट, लँडिंग गिअर ब्रेक आणि नोज व्हील स्टिअरिंग सिस्टीम या सर्व यंत्रणा ऑटोमॅटिकली कार्यान्वित झाल्या आणि हे विमान आरामात लँड झालं.

ISRO Pushpak Viman | eSakal

पुनर्वापर

रीयूजेबल, म्हणजेच पुन्हा वापर करता येणारे लाँच व्हीकल तयार केल्यामुळे अंतराळ मोहिमांवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

ISRO Pushpak Viman | eSakal

अंतराळ कचरा

लाँच व्हीकल पुन्हा जमीनीवर आणता येणं शक्य झाल्यामुळे अंतराळातील कचरा देखील कमी होण्यास मदत मिळेल. यामुळे सर्वांनाच मोठा फायदा होणार आहे.

ISRO Pushpak Viman | eSakal

तिसरी चाचणी

गेल्या कित्येक वर्षांपासून इस्रो रीयूजेबल लाँच व्हीकल बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यापूर्वी दोन वेळा अशा रॉकेटचं यशस्वी लँडिंग देखील करण्यात आलं आहे.

ISRO Pushpak Viman | eSakal

फायदा

आतापर्यंत एकदा प्रक्षेपित केलेलं यान पुढे अंतराळातच सोडून द्यावं लागत होतं. मात्र, आता या चाचणीनंतर हे यान पृथ्वीवर पुन्हा आणता येईल अशी खात्री झाली आहे.

ISRO Pushpak Viman | eSakal

आपला चंद्र गोल नाही? वाचा स्पेसबद्दल अजब गोष्टी

Interesting Space Facts | eSakal