Anushka Tapshalkar
जरी जिलेबीला भारताची राष्ट्रीय मिठाई मानलं जातं, तरी प्रत्यक्षात ती विदेशी मूळाची आहे, हे तुम्हाला माहितीये का?
इतिहासानुसार जिलेबीचा जन्म भारतात नव्हे तर पर्शिया देशात (आजचा ईरान) झाला. तिथे या मिठाईला ‘झलाबिया’ असं नाव आहे.
व्यापार, आक्रमण आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या मार्गाने ही मिठाई भारतात आली. असा विश्वास आहे की जिलेबी मध्ययुगीन काळात हिंदुस्थानात आली.
भारतामध्ये आल्यावर जिलेबीच्या चवीनुसार आणि बनवण्याच्या पद्धतीत काही बदल झाले. इथल्या चवीनुसार ती अधिक कुरकुरीत आणि गोडसर बनली.
फारसी भाषेतील ‘झलाबिया’ हे नाव भारतात ‘जिलेबी’ या नावाने रूढ झालं. उच्चार आणि भाषा बदलल्यानं नावातही थोडा फरक पडला.
भारतामध्ये जिलेबी ही केवळ एक मिठाई न राहता अनेक सण, उपवास, लग्नसमारंभ आणि नाश्त्याचा अविभाज्य भाग बनली आहे. पोहा-जिलेबी ही खास मराठमोळी जोडगोळी आजही लोकप्रिय आहे.
तसे पाहता जिलेबीला भारताची ‘राष्ट्रीय मिठाई’ म्हणून कोणताही अधिकृत दर्जा दिलेला नाही. मात्र तरीही ती लोकांच्या मनात आणि चवीत ‘राष्ट्रीय मिठाई’ म्हणूनच ओळखली जाते.
जरी तिचं मूळ परदेशात आहे, तरी जिलेबीने भारतीय मनं जिंकली आहेत. आज ती आपल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनली आहे.