Amit Ujagare (अमित उजागरे)
सध्या बाजारात फणस मोठ्या प्रमाणावर विकायला आलेले दिसतात. सध्या सिझन असल्यानं फणस सहज उपलब्धही असतं.
पण फणस खाताना काही चुका आवर्जुन टाळायला हव्यात नाहीतर तुम्ही आजारी पडू शकता.
जास्त प्रमाणात फणस खाल्यास शरिरावर विपरित परिणाम होऊ शकतो.
काही लोकांना आवडतं म्हणून ते मोठ्या प्रमाणावर फणस खातात. यात मोठ्या प्रमाणावर फायबर असल्यानं त्यामुळं पाचन सुधारतं.
पण जास्त प्रमाणात खाल्यानं अॅसिडीटी आणि शरिरावर सूज येऊ शकते.
फणसात कॅलरीज जास्त नसतात. त्यामुळं वजन कमी करण्यासाठी याचा चांगला वापर होतो, पण जास्त प्रमाणात आणि सातत्यानं खाल्यानं कॅलरीज वाढून वजन वाढू शकतं.
फणसात पोटॅशियम या खनिजाचं प्रमाणंही मुबलक असतं. यामुळं किडनीचा आजार असलेल्यांमधील इलेक्ट्रोलाईट असंतुलीत होऊ शकतं.
त्यामुळं आहार तज्ज्ञांचा सल्ला असतो की, नियमितपणे फणस खाण्याआगोदर त्याचा शरिरावर काही विपरित परिणाम तर होणार नाही ना? याची माहिती करुन घेणं गरजेचं आहे.