कार्तिक पुजारी
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही सध्या आपल्या 'मिस्टर अँड मिसेज माही' चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे
एका कार्यक्रमात बोलताना तिने ज्योतिषबाबत प्रतिक्रिया दिली आहे
तिने सांगितलं की, ती ज्योतिषवर विश्वास ठेवते. तसेच नेहमी ती तिचे राशी भविष्य तपासत असते
चित्रपटामध्ये भूमिका करणाऱ्या महिमाची कुंडली पाहून लग्न लावले जाते
यावरुन ती ज्योतिषवर विश्वास ठेवते का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता
यावर ती म्हणाली की, मला वाटतं आपण सर्व आपलं राशी भविष्य तपासतो. मीपण तसं अनेकदा करते
मी ज्योतिष शास्त्रावर विश्वास ठेवते, पण एखाद्याची रास पाहू त्याच्याशी बोलणं टाळण्याइतकं मी विश्वास ठेवत नाही, असं ती म्हणाली