सकाळ डिजिटल टीम
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘परम सुंदरी’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
केरळच्या कडक उन्हात शूटिंग करत असताना जान्हवीला जोरदार सनबर्नचा फटका बसला आहे.
जान्हवीने तिच्या जळालेल्या त्वचेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि "जळलेली" असा कॅप्शन दिला.
तिच्या चेहऱ्यावर नाराजी नव्हती, उलट ती प्रसन्न मूडमध्ये दिसली, आणि तिच्या जिद्दीने चाहत्यांना प्रभावित केलं.
‘मिस्टर अँड मिसेस माही’च्या शूटिंगदरम्यान तिने दोन्ही खांदे डिस्लोकेट केले होते आणि ‘गुंजन सक्सेना’च्या सेटवर गंभीर दुखापत झाली होती.
प्रत्येक वेळी तिने जिद्दीने कामावर फोकस करून दुखापतींवर मात केली आहे.
जान्हवी ‘परम सुंदरी’ चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. हा चित्रपट २५ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.