जन्माष्टमी आणि गोकुळाष्टमी एकच की वेगळी?

सकाळ डिजिटल टीम

महत्व

जन्माष्टमी आणि गोकुळाष्टमी या दोन्ही एकच आहेत की वेग वेगळ्या आहेत आणि यांचे महत्व काय आहे जाणून घ्या.

Janmashtami/Gokulashtami | sakal

कृष्ण जन्माष्टमी

या सणाचे मूळ नाव कृष्ण जन्माष्टमी आहे, जे भगवान श्रीकृष्णाच्या जन्माशी जोडलेले आहे. हा सण भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरा होतो.

Janmashtami/Gokulashtami | sakal

जन्माष्टमी

उत्तर भारत, विशेषतः मथुरा आणि वृंदावन, जिथे श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि त्यांनी बालपण घालवले, तिथे हा सण जन्माष्टमी म्हणून ओळखला जातो. या दिवशी मध्यरात्री श्रीकृष्णाची मूर्ती पाळण्यात ठेवून जन्मोत्सव साजरा केला जातो.

Janmashtami/Gokulashtami | sakal

गोकुळाष्टमी

महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये हाच सण गोकुळाष्टमी म्हणून प्रसिद्ध आहे. 'गोकुळ' हे श्रीकृष्णाच्या बालपणाशी संबंधित असल्यामुळे हे नाव पडले आहे.

Janmashtami/Gokulashtami | sakal

कृष्ण जन्म

दोन्ही ठिकाणी सण साजरा करण्याची पद्धत सारखीच असते. भक्त उपवास करतात, मंदिरात जाऊन पूजा-अर्चा करतात आणि रात्री १२ वाजता कृष्णाचा जन्म झाल्यानंतर पाळणा करतात.

Janmashtami/Gokulashtami | sakal

दहीहंडीचा उत्सव

महाराष्ट्रात गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव श्रीकृष्णाच्या 'गोविंदा' या रूपाशी जोडलेला आहे, ज्यात तो आपल्या मित्रांसोबत दही आणि लोणी चोरण्यासाठी मानवी मनोरा (Human Pyramid) तयार करायचा.

Janmashtami/Gokulashtami | sakal

नंदोत्सव

गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणाऱ्या उत्सवाला नंदोत्सव असेही म्हणतात, कारण गोकुळात नंद बाबांनी कृष्णाच्या जन्माचा आनंद साजरा केला होता.

Janmashtami/Gokulashtami | sakal

प्रचलित नाव

महाराष्ट्रात दहीहंडीला एक मोठा सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव म्हणून पाहिले जाते. त्यामुळे 'गोकुळाष्टमी' हे नाव अधिक प्रचलित आहे.

Janmashtami/Gokulashtami | sakal

सणामागची श्रद्धा

जन्माष्टमी आणि गोकुळाष्टमी हे एकच आहेत. फक्त प्रादेशिक आणि सांस्कृतिक परंपरेनुसार त्यांना वेगवेगळी नावे दिली गेली आहेत. सणामागची श्रद्धा, उद्देश आणि साजरा करण्याची भावना सारखीच आहे.

Janmashtami/Gokulashtami | sakal

गोविंदा आला रे! दहीहंडीच्या थरारक परंपरेची कहाणी

येथे क्लिक करा