Pranali Kodre
क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह आणि स्पोर्ट्स प्रेझेंटेटर संजना गणेशन हे लोकप्रिय सेलिब्रेटी जोडप्यांपैकी एक आहे.
ते नेहमीच त्यांचे गोड क्षणांचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करत असतात.
६ मे रोजी संजनाचा वाढदिवस असतो. त्यानिमित्ताने बुमराहने एक गोड व्हिडिओ पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
या व्हिडिओमध्ये ती डान्स करताना दिसत आहे.
पोस्टच्या कॅप्शनमध्ये बुमराहने लिहिले, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा माय लव्ह. तुला नेहमी प्रेम आणि आनंद मिळो. प्रत्येक क्षणी मी आणि अंगद तुझ्यासोबत असू. आमचं तुझ्यावर प्रेम आहे.'
या पोस्टवर संजानाने व्हिडिओवर आश्चर्च व्यक्त करताना 'हाहाहा, हे? खरंच?' अशी कमेंट केली आहे.
बुमराह आणि संजना यांनी मार्च २०२१ मध्ये लग्न केले होते. त्यांना अंगद हा मुलगा देखील आहे.