पुजा बोनकिले
यंदा माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील जया एकादशी ८ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे.
या दिवशी भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मीचीही पूजा केली जाते.
जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची मनोभावे पूजा केल्यास अनेक समस्या दूर होतात.
भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी पुढील गोष्टी अर्पण करू शकता.
भगवान विष्णूला नैवेद्यात खीर अर्पण करावी.
भगवान विष्णूला झेंडूचे फुल अर्पण करावे.
भगवान विष्णूला तुळशीचे पान प्रिय आहे.
जया एकादशीला भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप करावा.