Apurva Kulkarni
यूट्यूबर ज्योति मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना अटकेत! अनेकांना प्रश्न पडतो की ISI एका हेराला किती पैसे देते?
2020 पर्यंत एका खासगी कंपनीत काम करणारी ज्योति मल्होत्रा नंतर यूट्यूबर बनली. याच काळात ती पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आली.
ISI कोणत्या ठिकाणाहून माहिती मिळवायची आहे यानुसार पैशांची रक्कम ठरवते. भारत आणि अमेरिकेसारख्या देशांमधून माहिती मिळवणे अधिक खर्चिक असते.
थायलंड आणि म्यानमारसारख्या देशांमधून माहिती मिळवण्यासाठी कमी पैसे दिले जातात. परंतु भारतासाठी ISI जास्त रक्कम खर्च करते.
पाकिस्तान सरकार दरवर्षी ISI ला 5 अब्ज रुपये इतके बजेट देते. या बजेटमधून एजंट आणि कर्मचाऱ्यांचे पगार तसेच इतर खर्च भागवले जातात.
एका अहवालानुसार, ISI मध्ये सुमारे 4000 कर्मचारी कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त, अनेक गुप्त एजंट वेगवेगळ्या देशांमध्ये सक्रिय आहेत.
2025 मध्ये अटक झालेल्या एका एजंटने खुलासा केला की ISI लहान स्वरूपाच्या माहितीसाठी ₹ 5000 रुपये आणि मोठ्या स्वरूपाच्या माहितीसाठी 10000 रुपये देते.
2011 मध्ये पकडलेल्या एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की पाकिस्तानने त्याला गोपनीय माहितीच्या बदल्यात 3 कोटी दिले होते.
सध्या तरी ज्योति मल्होत्राला या हेरगिरीसाठी किती पैसे मिळाले हे स्पष्ट झालेले नाही.