Shubham Banubakode
युट्यूबर ज्योती मल्होत्रावर पाकिस्तानसाठी हेरगिरी आणि संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तिला अटक केली आहे.
ज्योती मल्होत्रावर ऑफिशियल सीक्रेट्स अॅक्ट, 1904 च्या कलम 3 आणि 5 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. हा कायदा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे.
कलम 3 अंतर्गत, गुप्त माहिती परदेशी व्यक्तीला पुरवणे किंवा हेरगिरी करणे गुन्हा मानला जातो. यामध्ये सैन्य, हवाई दल, नौदलाशी संबंधित माहितीचा समावेश असतो.
जर ज्योतीवरील आरोप सिद्ध झाले तर तिला 7 वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतो.
कलम 5 अंतर्गत, गुप्त माहिती परदेशी व्यक्तींजवळ उघड करणे हा गुन्हा आहे. ज्योतीवर असा आरोप आहे की तिने संवेदनशील माहिती पाकिस्तानी एजंटला दिली.
कलम 5 अंतर्गत आरोप सिद्ध झाल्यास, ज्योतीला 3 वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतो.
हेरगिरीच्या आरोपांमुळे ज्योतीवर भारतीय न्याय संहितेतील इतर संबंधित कलमांतर्गतही खटला चालवला जाऊ शकतो, उदा. देशद्रोह
ज्योतीवरील तिच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास तिला अंदाजे १० वर्ष कारावास किंवा दंड किंवा दोन्ही अशा स्वरुपाची शिक्षा होऊ शकते.