Aarti Badade
कैलास पर्वत हा भगवान शंकराचे निवासस्थान मानला जातो. या पवित्र पर्वतावर आजवर कोणीही यशस्वी चढाई करू शकलेले नाही.
ज्यांनी चढाईचा प्रयत्न केला त्यांना कमजोरी जाणवली, हृदय वेगाने धडधडले. काही जणांना वाटले की वेळ इथे जलद चालतो आहे.
कैलास जवळ पोहोचल्यावर केस व नखं जलद वाढतात, शरीरावर वेगळे परिणाम होतात. विज्ञान याचे कारण शोधू शकले नाही.
फक्त एक व्यक्ती – तिबेटी संत मिलारेपा – यांनी कैलास पर्वतावर चढाई करण्यात यश मिळवले, अशी मान्यता आहे.
मिलारेपा हे ११व्या शतकातील तिबेटी संत होते. त्यांनी आधी तंत्र विद्या शिकून ८० लोकांचा मृत्यू घडवून आणला होता.
आपल्या कृत्यांचा पश्चात्ताप झाल्यावर त्यांनी आध्यात्माचा मार्ग स्वीकारला आणि गुरू मार्पा यांची दीक्षा घेतली.
साल १०९३ मध्ये मिलारेपा यांनी पश्चिम दिशेने कैलास पर्वतावर चढाई सुरू केली आणि शिखर गाठले.
बोन धर्माचे नरोवान व मिलारेपा यांच्यात शिखरावर पोहोचण्याची शर्यत झाली. सूर्यप्रकाशाने नरोवान मागे सरले आणि मिलारेपा शिखरावर पोहोचले.
मिलारेपा यांनी कैलास पर्वतावर अनेक वर्षं कठोर साधना केली आणि नंतर आपले ज्ञान लोकांमध्ये पसरवले.
‘हंड्रेड थाउजंड साँग्स ऑफ मिलारेपा’ या ग्रंथानुसार त्यांनी एक लाख गीते रचली. ते संत, कवी आणि आत्मोन्नतीचा आदर्श बनले.