Aarti Badade
आज, ४ जुलै २०२५ रोजी, आषाढ शुद्ध नवमी आहे, म्हणजेच कांदे नवमी! या दिवसाला भडली नवमी असेही म्हणतात.
या दिवशी कांद्याचे विविध आणि चविष्ट पदार्थ बनवून खाण्याची खास परंपरा आहे.
कांदे नवमीला कांद्याचे पदार्थ खाल्ले जातात, कारण यानंतर लगेच चातुर्मास सुरू होतो.
चातुर्मासात कांदा, लसूण आणि मांसाहार करणे वर्ज्य मानले जाते, त्यामुळे त्याआधी या पदार्थांचा आस्वाद घेतला जातो.
कांदेनवमीच्या उत्साहात बायकांनी घेतलेले हे काही खास उखाणे, जे तुम्हाला नक्कीच आवडतील:
कांदा चिरताना डोळ्यात येते पाणी, कांदे नवमीच्या दिवशी नाव घेते - रावांची राणी.
पावसाळ्यात आकाशात गरजतात ढग काळे काळे, राव आहेत वेंधळे, कांदे घेऊन या म्हटले तर घेऊन आले मुळे.
कांदे नवमीच्या निमित्ताने बनवली खमंग मिसळ, राव आले घरी, पोरे ओरडली, आई पळ पळ!
गुंडीच्या रूखवतासाठी केली कांद्याची कमळे, मी आहे ठेमेठोक पण राव आमचे सांब भोळे...
कांदा-पोहे केले, _____ रावांना खूप आवडले, त्यांच्या आवडीचं जेवण, आज कांदे नवमीला केले.
कांद्याची भाजी, झाली एकदम खास, __ रावांचं नाव घेते, त्यांचाच माझ्यावर विश्वास
बाजारात फिरता फिरता, कांदा दिसला छान, _____ रावांचं नाव घेते, आज आहे कांदे नवमीचं
कांद्याचे भजे, ____ रावांना खूप आवडतात, त्यांच्या आवडीचे पदार्थ, आज कांदे नवमीला बनवतात.