Anuradha Vipat
‘स्त्री 2’ हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित झाला होता
‘स्त्री 2’ सिनेमाने 2 दिवसांत 90 कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे.
आता यावर अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौतने सिनेमाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
सध्या सर्वत्र कंगनाच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर कंगनाने ‘स्त्री 2′ साठी खास पोस्ट लिहिली आहे.
पोस्टमध्ये कंगणाने लिहिलं आहे की, ”स्त्री 2′ सिनेमाने सर्व रेकॉर्ड मोडले आहे. संपूर्ण टीमला शुभेच्छा, पण सिनेमा खरा हिरो हा कायम दिग्दर्शक असतो
पुढे पोस्टमध्ये कंगणाने लिहिलं आहे की, भारतात दिग्दर्शकांचं व्हायला हवं तसं कौतुक होत नाही. शिवाय सिनेमा हीट झाल्यानंतर देखील अधिक श्रेय दिग्दर्शकाला मिळत नाही. त्यामुळे तरुणांना लेखक किंवा दिग्दर्शक व्हायचं नसतं