सकाळ डिजिटल टीम
बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने फिल्ममेकिंगसंबंधी आपली भूमिका एका मुलाखतीत स्पष्ट केली.
करण जोहर म्हणतो की, "यशस्वी सिनेमा बनवण्यासाठी तर्कापेक्षा दृढ विश्वास अधिक महत्त्वाचा असतो."
करण जोहरने एस. एस. राजामौलीच्या 'आरआरआर' आणि 'बाहुबली' यासारख्या चित्रपटांचा उल्लेख करत सांगितलं की, या सिनेमांमध्ये लॉजिक नाही, पण दृढ विश्वासामुळे ते प्रेक्षक स्वीकारतात.
करण जोहरने सनी देओलच्या चित्रपटांचा संदर्भ घेत सांगितलं की, "सनी देओल एका हाताने हजार लोकांना पाडू शकतो" हा अनिल शर्मांचा दृढ विश्वास दर्शवितो.
करण जोहरने स्पष्ट केलं की, "निर्मात्याला त्याच्या कथेवर ठाम विश्वास असला तर, कोणताही चित्रपट ब्लॉकबस्टर होऊ शकतो."
करणने सांगितलं की, चित्रपट निर्मितीमध्ये विश्वास असणं महत्त्वाचं आहे, कारण प्रेक्षक त्याच विश्वासाशी जोडले जातात.
करण जोहरने सांगितलं की, चित्रपटाची कथा आणि त्या कथेमधील विश्वास प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. जर कथेवर ठाम विश्वास असेल, तर प्रेक्षक त्या सिनेमाला आपलंसं करतात आणि त्याला मनापासून स्वीकारतात.