'कराओके'च्या निर्मात्याचं वयाच्या 100व्या वर्षी निधन

Sudesh

नेगिशी

कराओके मशीनचे निर्माता शिगेईची नेगिशी यांचं वयाच्या 100 व्या वर्षी निधन झालं.

Karaoke Inventor Shigeichi Negishi | eSakal

कराओके

आजकाल Karaoke जगभरात लोकप्रिय झालं आहे. भारतात देखील कित्येक ठिकाणी अशा मशीन्स उपलब्ध आहेत.

Karaoke Inventor Shigeichi Negishi | eSakal

स्पार्को बॉक्स

1967 साली नेगिशी यांनी पहिली कराओके मशीन तयार केली होती. याला 'स्पार्को बॉक्स' असं नाव दिलं होतं.

Karaoke Inventor Shigeichi Negishi | eSakal

आवड

नेगिशी यांना टीव्हीवर किंवा रेडिओवर गाणी लागलेली असताना त्यासोबत गाण्याची आवड होती. यातूनच त्यांना कराओके बॉक्सची कल्पना सुचली.

Karaoke Inventor Shigeichi Negishi | eSakal

जपानमध्ये प्रसार

नेगिशी यांनी जपानमध्ये विविध रेस्टॉरंट किंवा अन्य ठिकाणी तब्बल 8,000 कराओके बॉक्स ठेवले होते.

Karaoke Inventor Shigeichi Negishi | eSakal

बिझनेस

नेगिशी यांना कराओकेला जेवढा प्रतिसाद अपेक्षित होता, तेवढा मिळाला नाही. 1975 सालीच ते या बिझनेसमधून बाहेर पडले.

Karaoke Inventor Shigeichi Negishi | eSakal

मोठ्या कंपन्या

यानंतर काही वर्षांनंतर मोठमोठ्या कंपन्यांनी कराओके मशीन्सचं उत्पादन सुरू केलं. त्यानंतर मात्र या मशीन जगभरात लोकप्रिय झाल्या.

Karaoke Inventor Shigeichi Negishi | eSakal

पहिली मशीन

विशेष म्हणजे, नेगिशी यांनी बनवलेली पहिली कराओके मशीन अजूनही काम करते.

Karaoke Inventor Shigeichi Negishi | eSakal

वैज्ञानिक न्यूटन लागला होता जादूटोण्याच्या मार्गाला..

newton philosopher's stone | eSakal