सकाळ डिजिटल टीम
करिश्मा कपूरने 90 च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने बॉलिवूडमध्ये मोठा ठसा निर्माण केला.
१९९२ मध्ये प्रदर्शित "जिगर" चित्रपटाच्या सेटवर एक वाद घडला, ज्यामुळे करिश्मा कपूर रडत-रडत सेटवरून निघून गेली.
"जिगर" चित्रपटाच्या गाण्याच्या शूटिंगदरम्यान करिश्माकडून वारंवार चुकत असल्यामुळे नृत्यदिग्दर्शक चिन्नी प्रकाश संतापले आणि रागाने तिला सुनावले.
चिन्नी प्रकाश यांच्या रागामुळे करिश्मा खूप अस्वस्थ झाली आणि तिने लगेचच शूटिंग थांबवून सेटवरून निघून जाण्याचा निर्णय घेतला.
निर्माते सलीम अख्तर यांनी करिश्माला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु ती शांत होईपर्यंत काही वेळ लागला.
अखेरीस, चिन्नी प्रकाश यांनी करिश्मापासून माफी मागितली, त्यानंतरच ती शूटिंगला परत आली.
एका मुलाखतीत, करिश्माने सांगितले की, "माझ्यावर चुकीच्या पद्धतीने राग काढण्यात आला, त्यामुळे मी भावनिक झाले."
करिश्मा म्हणाली, "त्या क्षणी माझी मानसिक अवस्था योग्य नव्हती, म्हणून मी सेटवरून निघून गेले."