१४ महिन्यांमध्ये कार्तिकने कसे घटवले १८ किलो वजन?

Monika Lonkar –Kumbhar

चंदू चॅंपियन

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने त्याच्या आगामी चंदू चॅंपियन या चित्रपटासाठी तब्बल १८ किलो वजन घटवले आहे.

ट्रांन्सफॉर्मेशन

या सिनेमासाठी कार्तिकने जबरदस्त ट्रांन्सफॉर्मेशन केले आहे. त्याचा हा लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

वर्कआऊट आणि डाएट

कार्तिकने पहाटे वर्कआऊट करण्यासोबतच स्ट्रीक्टली डायट फॉलो केले, असे त्याचा ट्रेनर त्रिदेव पांडेने इंडिया टुडेशी बोलताना सांगितले.

सुरूवातीला कार्तिकने वर्कआऊट करायला सुरूवात केली, तेव्हा त्याचे वजन ९० किलो होते.

वर्कआऊट

९० किलो वजन असल्यामुळे कार्तिकने पुश-अप आणि पुल-अप्सपासून वर्कआऊटची सुरूवात केली होती.

९० किलो ते ७२ किलो

९० किलोपासून ते ७२ किलोपर्यंत येण्यासाठी कार्तिकने तब्बल १४ महिने फिटनेसवर कठोर मेहनत घेतली.

कार्तिकने वजन घटवण्यासाठी कोणतेच इंजेक्शन किंवा स्टेरॉईड्स घेतले नाहीत, असे त्याच्या ट्रेनरने सांगितले.

कार्तिकने फिटनेसवर मेहनत घेतली तो चंदू चॅंपियन सिनेमा १४ जूनला रिलीज होणार असून यात कार्तिकने प्रमुख भूमिका निभावली आहे.

चिंब भिजलेले, रूप सजलेले..!

Monsoon Travel Places | esakal