सकाळ डिजिटल टीम
१८५७ च्या उठावात खाज्याजी नाईक यांचा संघर्ष दडलेला आहे. या महान योद्ध्याची गाथा जाणून घेऊया.
भिल्ल ही जुनी आणि लढवय्या जमात आहे. ती महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये आढळते. 'तडवी', 'ढोली' अशा नावांनी ती ओळखली जाते.
१८३० मध्ये खाज्याजी नाईक शिरपूर-सेंधवा येथे जन्माला आले. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्यावर लगेच जबाबदारी आली.
खाज्या नाईक शौर्याने इंग्रज पोलिसांत भरती झाले; पण एका खोट्या गुन्ह्यात त्यांना ४० वर्षांची शिक्षा झाली. हा मोठा अन्याय होता.
ते तुरुंगात असताना त्यांची पत्नी तुळसीचे निधन झाले. त्यांचा मुलगा दौलतसिंह पोरका झाला. या घटनेने ते क्रांतिकारक बनले.
इंग्रजांनी सैन्यात भरतीचा आदेश दिला. खाज्याजी नाईकांनी तो नाकारला. ते भूमिगत झाले. त्यांनी भिल्लांच्या टोळ्या एकत्र केल्या.
त्यांनी इंदूर-मुंबई खजिन्याची गाडी लुटली. ७ लाख रुपये मिळवले. अफूच्या ६० गाड्याही लुटल्या. इंग्रज सरकार हादरले.
खाज्या नाईकांनी सेंधवा, पळसनेर येथील पोस्ट ऑफिस लुटले. शिरपूरचा बाजारही लुटला. अंबापाणी येथे मोठे युद्ध झाले. यात त्यांचा मुलगा दौलतसिंह शहीद झाला.
इंग्रजांनी त्यांना चर्चेच्या बहाण्याने अटक केली. त्यांना लिंबाच्या झाडावर फाशी दिली. त्यांचा मृतदेह १० दिवस लटकवून ठेवला.
इंग्रजांना वाटले, भिल्ल घाबरतील; पण खाज्याजी नाईकांच्या बलिदानाने भिल्ल समाज अधिक पेटला. त्यांचा लढा पुढे सुरूच राहिला.