Monika Shinde
मुलांना खायला घालणं अनेक आईंसाठी एक आव्हान असतं. पण रोल हा एक असा पर्याय आहे जो चविष्टही असतो आणि पौष्टिकही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मुलं तो आवडीने खातात
उकडलेले बटाटे मॅश करून घ्या. त्यात मीठ, लाल तिखट, हळद, धणे पूड आणि थोडंसं गरम मसाला घालून चविष्ट सारण तयार करा. हे मिश्रण पोळी किंवा पराठ्यावर पसरवा आणि रोल करून द्या.
पनीर किसून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, गाजर, कोबी, मीठ आणि मिरी पूड मिसळा. हे मिश्रण पोळीमध्ये भरून रोल तयार करा.
जर मुलं डाळ खाणं टाळत असतील, तर उकडलेली डाळ थोडीशी मॅश करून त्यात मसाला घालून पराठ्यामध्ये भरून रोल करा. हा रोल प्रोटीन आणि फायबरने भरलेला असतो.
उकडलेल्या मक्याच्या दाण्यांत किसलेलं चीज, थोडंसं मीठ आणि मिरी पूड मिसळा. हे मिश्रण पोळी किंवा टॉर्टिलामध्ये भरून रोल करा आणि तव्यावर थोडं गरम करून चीज मेल्ट होऊ द्या.
मुगडाळीचं चिल्लं तयार करा. चिल्ल्यावर पनीर किंवा बटाट्याचं सारण ठेवा आणि रोल करून घ्या.
बारीक चिरलेली गाजर, कोबी, शिमला मिरची आणि मटार थोड्या तेलात परतून घ्या. त्यात मीठ, मिरी पूड आणि थोडंसं सोया सॉस घालून परतून पोळीमध्ये भरून रोल करा.
अंडी फेटून त्यात मीठ व मिरी पूड मिसळा. तव्यावर थोडं तेल लावून ऑम्लेट तयार करा. हे ऑम्लेट पोळी किंवा पराठ्यावर ठेवून रोल करा.