Pranali Kodre
भारतीय संघाने ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला.
या सामन्यात रविंद्र जडेजाने दमदार अर्धशतक ठोकत भारताला फॉलोऑन मिळण्यापासून वाचवण्यात मोलाचा वाटा उचलला.
पण त्याच्या फलंदाजीवेळी त्याची बॅटही चर्चेत होती, यामागील कारण म्हणजे त्याच्या बॅटवर घोड्याचं चित्र असून त्यावर लिहिलंय 'मारवाडी स्टॅलियन'
खरंतर मारवाडी ही एक घोड्यांचीच जात आहे. जडेजा हा अश्वप्रेमी आहे. त्याच्याकडे त्याने घोडेही पाळले आहेत.
मारवाडी घोड्यांचे मुळ मारवाडमधील आहे. त्यांचं वजन ७५० ते १००० पाउंड्स इतके भरते.
मारवाडी घोडे साधारण १४ ते १६ हात उंच असतात. त्यांचा उपयोग दूरच्या प्रवासासाठीही केला जातो.
मारवाडी घोड्यांचं आयुष्य साधारण २५ ते ३० वर्षे असतं.
अनेक रिपोर्ट्सनुसार २ लाख ते २५ लाखापर्यंत त्यांची किंमत असते.