Mansi Khambe
मुंबईत गणेश चतुर्थी उत्सव सर्वात मोठ्या आणि भव्य पद्धतीने साजरा केला जातो. १० दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा समारोप 'गणपती विसर्जन' ने होतो, जो एक अविस्मरणीय अनुभव असतो.
या दिवशी, ढोलताशांच्या गजरात आणि मिरवणुकीसह हजारो गणेश मूर्तींचे समुद्रात विसर्जन केले जाते. तुम्हालाही मुंबईतील मोठे आणि प्रसिद्ध गणरायाचे विसर्जन पाहायचे असतील तर या ठिकाणी नक्कीच भेट द्या.
मुंबईतील गिरगाव चौपाटी हे गणपती विसर्जनाचे केंद्र आहे. लालबागचा राजासह शहरातील अनेक मोठ्या गणरायाचे विसर्जन पाहण्यासाठी येथे मोठ्या संख्येने लोक जमतात.
दादरच्या मध्यभागी असलेले, शिवाजी पार्क चौपाटी हे मूर्ती विसर्जनासाठी आणखी एक लोकप्रिय ठिकाण आहे. येथे, भाविक त्यांच्या गणेश मूर्ती उद्यानातील एका खास तयार केलेल्या कृत्रिम तलावात घेऊन जातात.
जुहू बीच या ठिकाणी विसर्जन दुपारी सुरू होते आणि रात्री उशिरापर्यंत चालू राहते. येथे छोट्या गणपतीसह सार्वजनिक गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन मोठ्या थाटामाटात होते. भारतातील आणि परदेशातील लोक अनेकदा शहरातील सर्वात प्रतिष्ठित गणपती निरोप समारंभाचा भाग होण्यासाठी येथे येतात.
पवई तलाव गणपती विसर्जनाचा शांत पण तितकाच भावनिक अनुभव देतो. उच्चभ्रू हिरानंदानी परिसरात असणारे हे ठिकाण गिरगाव किंवा जुहूच्या तुलनेत कमी गर्दीचे असते, ज्यामुळे शांत वातावरणात येथे बाप्पाचे विसर्जन होते.
जुहूच्या जवळ स्थित, वर्सोवा बीच त्याच्या विसर्जन समारंभांसाठी तितकेच प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या उत्साहात एकत्र येणाऱ्या भाविकांचे मोठे मेळावे होतात.
गणेश चतुर्थीच्या शेवटच्या दिवशी, 'गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोषाने हा परिसर उत्सवाचे केंद्र बनतो.