Mansi Khambe
आकाशात उडणाऱ्या विमानाबाबत अनेकांना प्रश्न पडतात. जसे उड्डाणादरम्यानच विमानाचे इंधन संपले तर ते उडणार की नाही.
हे सर्व विमानाच्या डिझाइनवर, त्याच्या जागेवर आणि टाकीवर अवलंबून असते. जाणून घेऊ एका तासाच्या उड्डाणासाठी विमान किती इंधन वापरते
विमानाची इंधन क्षमता त्याच्या वजनावर, उड्डाणाच्या अंतरावर आणि बऱ्याच प्रमाणात हवामानाच्या परिस्थितीवर अवलंबून असते
काही मोठ्या विमानांना प्रति तास १४,४०० लिटर इंधन, तर लहान विमानांना प्रति तास २,५०८ लिटर इंधन वापरावे लागते.
विमान अधिक उंचीवर गेल्यावर इंधनाची कार्यक्षमता वाढते. तसेच प्रवासी संख्येप्रमाणेही विमानाचे वजन वाढल्याने इंधनचा वापर वाढतो.
आकाशात बदलते हवामान, वाऱ्याचा वेग आणि दिशा, वादळ आणि तापमान यांचा प्रभाव इंधनावर पडतो.
टेकऑफ आणि लँडिंग या दरम्यान इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. .
सध्याच्या काळात विमान कंपन्या अधिक कार्यक्षम इंजिन, हलकी सामग्री, आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान वापरून इंधन बचत करण्याचा प्रयत्न करत आहेत.