साखळी ओढल्याने संपूर्ण ट्रेन कशी थांबते? लोको पायलटला कसे कळते? वाचा यामागील तंत्रज्ञान...

Mansi Khambe

लाल रंगाची साखळी

भारतीय रेल्वेमध्ये प्रवास करताना तुम्ही प्रत्येक कोचमध्ये लाल रंगाची साखळी लटकलेली पाहिली असेल. ही सामान्य दोरी नाही तर आपत्कालीन प्रणालीचा एक भाग आहे.

Train Chain Pulling | ESakal

अलार्म साखळी पुलिंग

याल आपत्कालीन साखळी किंवा अलार्म साखळी पुलिंग म्हणतात. तुम्हाला कधीतरी प्रश्न पडला असेल की ही छोटी साखळी ओढून एवढी मोठी ट्रेन कशी थांबते? यामागे कोणते तंत्रज्ञान काम करते?

Train Chain Pulling | Esakal

यांत्रिक झडप

जेव्हा प्रवासी ही साखळी ओढतात तेव्हा एक यांत्रिक झडप उघडते. जी ट्रेनच्या ब्रेक पाईपशी जोडलेली असते. ही पाईप ट्रेनच्या एअर ब्रेक सिस्टमचा भाग असते.

Train Chain Pulling | ESakal

एअर ब्रेक सिस्टम

भारतीय रेल्वेच्या बहुतेक गाड्या एअर ब्रेक सिस्टम वापरतात. ज्यामध्ये डब्यांना जोडणाऱ्या पाइपलाइनमध्ये कॉम्प्रेस्ड हवा सतत वाहत राहते.

Train Chain Pulling | ESakal

ट्रेनचे ब्रेक

ही संकुचित हवा एक विशिष्ट दाब राखते. ज्यामुळे ट्रेनचे ब्रेक उघडे राहतात. साखळी ओढताच झडप उघडते आणि या पाईपमधून हवा बाहेर पडते. यामुळे सिस्टममधील दाब कमी होतो.

Train Chain Pulling | ESakal

आपत्कालीन परिस्थिती

ही आपत्कालीन परिस्थिती म्हणून ओळखली जाते. दाब कमी होताच ब्रेक आपोआप लागू होतात. ट्रेनचा वेग कमी होतो आणि थांबतो.

Train Chain Pulling | ESakal

लोको पायलट

नवीन गाड्यांमध्ये लोको पायलटला ताबडतोब कंट्रोल पॅनलवरील अलार्म किंवा लाईटद्वारे माहिती मिळते की कोणत्या कोचमध्ये साखळी ओढली गेली आहे.

Train Chain Pulling | ESakal

कायदेशीर गुन्हा

यानंतर ट्रेन थांबताच गार्ड किंवा रेल्वे कर्मचारी त्या कोचमध्ये जातात आणि ते तपासतात. जर कोणत्याही वैध कारणाशिवाय साखळी ओढली गेली तर तो कायदेशीर गुन्हा आहे.

Train Chain Pulling | ESakal

तुरुंगवासाची शिक्षा

अशा प्रकरणांमध्ये, दोषी व्यक्तीला मोठा दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. भारतीय रेल्वे आता ही प्रणाली अधिक स्मार्ट बनवत आहे.

Train Chain Pulling | ESakal

स्मार्ट प्रणाली

चेन पुलिंगवर लक्ष ठेवू शकणारे इलेक्ट्रॉनिक अलार्म सिस्टम, सेन्सर आधारित ब्रेक सिलिंडर, जे चेन पुलिंगचे अचूक स्थान नोंदवतात.

Train Chain Pulling | ESakal

व्यक्तीच्या आत्म्याचे वजन किती असते? धक्कादायक तथ्य समोर

scientist experiment | ESakal
येथे क्लिक करा