संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात; सरकार एका तासाच्या कामकाजासाठी किती खर्च करते?

Mansi Khambe

संसदेचे अधिवेशन

या वर्षीचे पावसाळी अधिवेशन आजपासून म्हणजेच २१ जुलैपासून सुरू झाले आहे. हे अधिवेशन २१ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त १२ ते १८ ऑगस्टपर्यंत कामकाज तहकूब केले जाईल.

Parliament Monsoon session | ESakal

अनेक महत्त्वाची विधेयके

सरकार या अधिवेशनासाठी अनेक महत्त्वाची विधेयके सादर करू शकते. तर दुसरीकडे विरोधक अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्यासाठी सज्ज असतील.

Parliament Monsoon session | ESakal

वेळेचा अपव्यय

या काळात संसदेत अनेक वेळा गोंधळ आणि बहिष्कार यासारख्या गोष्टी पाहायला मिळतात. ज्यामुळे वेळेचा अपव्यय होतो.

Parliament Monsoon session | ESakal

किती पैसे खर्च होतो?

या काळात, असा प्रश्न देखील उपस्थित होतो की सरकार एका तासाच्या कामकाजासाठी किती पैसे खर्च करते? याचे उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Parliament Monsoon session | ESakal

जेवणाची सुट्टी

संसदेचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरू होते आणि संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालते. यात खासदारांना दुपारी १ ते २ वाजेपर्यंत जेवणाची सुट्टी देखील मिळते.

Parliament Monsoon session | ESakal

संसदेला सुट्टी

शनिवार आणि रविवार वगळता संसदेचे कामकाज पाच दिवस चालते. अधिवेशनादरम्यान कोणताही सण आला तर संसदेला सुट्टी दिली जाते.

Parliament Monsoon session | ESakal

मिनिटाचा खर्च

जर अहवालांवर विश्वास ठेवला तर, संसदेच्या प्रत्येक कामकाजावर प्रत्येक मिनिटाचा खर्च सुमारे २.५ लाख रुपये असेल असा अंदाज आहे.

Parliament Monsoon session | ESakal

तासाचा खर्च

जर तासाभराच्या आधारावर पाहिले तर एका तासात सुमारे दीड कोटी रुपये खर्च होतात. संसदेचे अधिवेशन ७ तास चालते. म्हणून जर आपण जेवणाच्या सुट्टीतून एक तास काढला तर ६ तास उरतात.

Parliament Monsoon session | ESakal

लाखो रुपयांचा अपव्यय

या सहा तासांत, केवळ मुद्द्यांवर वादविवाद आणि चर्चा होत नाहीत तर निषेध आणि गोंधळ देखील होतो. ज्यामुळे लाखो रुपयांचा अपव्यय होतो.

Parliament Monsoon session | ESakal

भारताचे पहिले 'लव्ह गुरू' कोण? शेकडो वर्षांपूर्वी प्रेमावर पुस्तक लिहिले, पण स्वत:अविवाहित राहिले

Maharshi Vatsyayana | ESakal
येथे क्लिक करा