रोहित कणसे
सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये प्रत्येकजण वायफट खर्च करू लागला आहे, ज्यामुळे सेव्हिंग करणे शक्य होत नाही. लोकांचा दैनंदिन खर्च देखील तुफान वाढत आहे.
बऱ्याचदा आपण ऐकतो की लोक त्याच्याकडील पैसे महिनाभर टिकवू शकत नाहीत, अशावेळी सेव्हिंग करणे तर खूप लांब राहाते.
सेव्हिंग प्रत्येकासाठी खूप गरजेची असते, कारण आपत्तीच्या काळात सेव्हिंगच आपल्या कामी येते, आज आपण सेव्हिंगसाठी काही खास टीप्स जाणून घेणार आहोत.
बरेचसे लोक आपल्या महिन्याचा खर्च आणि गरजा याचे बजट बनवत नाहीत, त्यामुळे पैसे आधीच खर्च होऊन जातात त्यामुळे तुमच्या खर्चाचे बजेट नक्की बनवा आणि त्यानुसार खर्च करा.
महिन्याच्या सुरूवातीलाच बजेट बनवले तर वायफट खर्च कमी होईल आणि सेव्हिंग देखील होईल.
बरेचसे लोक क्रेडिट कार्टचा वापर गरज नसताना देखील करतात, त्यामुळे लोकांचा जास्त पैसा खर्च होतो आणि सगळी सॅलरी इएमआय भरण्यातच खर्च होऊन जाते. त्यामुळे क्रेडिट कार्ड मर्यादेतच वापरा.
सुरूवातीला सेव्हिंगची सवय लागायला थोडे अवघड जाईल, मात्र सेव्हिंग करण्यासाठी त्याची सवय होणे गरजेचे आहे. यामुळे महिन्यात थोडी सेव्हिंग होऊ शकेल.
बऱ्याचदा लोक मॉलमध्ये जाऊन गरजेच्या नसलेल्या वस्तू खरेदी करतात, यामुळे सेव्हिंग होऊ शकत नाही. त्यामुळे अशा सवयींपासून दूर राहा. शक्यतो मॉलसारख्या ठिकाणी जाणे टाळा.
म्हणून विद्या बालन राहते भाड्याच्या घरात