रोहित कणसे
भारताचा गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्रा पुन्हा एकदा ऑलिम्पिक स्पर्धेत फायनलमध्ये दाखल झाला असून संपूर्ण देश त्याच्याकडे आशेने डोळे लावून आहे.
ऑलिंपिक ॲथलेटिक्समध्ये सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय ॲथलिट ठरलेल्या नीरज चोप्राबद्दल इंटरनेटवर अनेक गोष्टी सर्च केल्या जात आहेत, यामध्ये नीरज फेकतो त्या भाल्याचे वजन आणि किंमत देखील सर्च केला जातेय.
नीरज चोप्रा फेकतो तो भाला नेमका किती वजनाचा असतो अन् त्याची बाजारात किंमत किती असते याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
या स्पर्धेत वापरला जाणाऱ्या पुरूषांच्या भाल्याचे वजन ८०० ग्रॅम असते आणि लांबी २.६ ते २.७ मीटर असते, तर महिलांसाठी हे वजन ६०० ग्रॅम आणि लांबी २.२ ते २.३ मीटर असते.
२०२२ मध्ये बीसीसीआयने पंतप्रधान मोदींच्या ई-ऑक्शनमध्ये नीरज चोप्राचा भाला १.५ कोटींना खरेदी केला होता. ऑनलाईन हा भाला ९३० ते ८०००० रुपयांपर्यंत विकत मिळतो.
नीरज चोप्राची भालाफेकीची मॅच ८ ऑगस्ट रोजी रात्री ११.५५ वाजता होणार आहे.
भालाफेक हा हजारो वर्ष जुना खेळ असून सुरुवातीला लोक शिकारीसाठी भाले फेकत असत, पण हळूहळू तो एक खेळ बनला.ऑलिम्पिक खेळांमध्ये अनेक वर्षांपासून भालाफेकचाही समावेश करण्यात आला आहे.
भाला फेकण्यासाठी एक खास जागा असते, पळत येऊन येथेन फक्त एका हाताने भाला फेकला जातो. भाला खांद्याच्या वर ठेवूनच फेकावा लागतो. भाला जितका दूर जाईल तितके जास्त गुण मिळतात, या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूला सहा चान्स मिळतात ज्यामध्ये सर्वात दूरवर भाला फेकणारा खेळाडू जिंकतो.
श्वेता तिवारीचा लेक पलकला लग्नाबद्दल मोलाचा सल्ला