स्कूल बसचा रंग पिवळाच का असतो? जाणून घ्या खरं कारण…

Mansi Khambe

गाड्यांचे रंग

रस्त्यावर तुम्ही अशा अनेक गाड्या पाहिल्या असतील, ज्या वेगवेगळ्या रंगाच्या असतात. प्रत्येक रंगाला त्याचे एक महत्त्व असते.

School Bus Color | ESakal

स्कुलबसचा रंग

तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिले असेल तर तुमच्या लक्षात येईल की, अनेक स्कुलबसचा रंग पिवळा असतो. पण, तुम्ही कधी विचार केला की शाळेच्या बसचा रंग का पिवळा का असतो?

School Bus Color | ESakal

कारण काय

शाळेच्या बसला पिवळा रंग देण्यामागे एक खास कारण आहे. ते कारण कोणते? या विषयीच सविस्तर जाणून घ्या.

School Bus Color | ESakal

अमेरिकेतील स्कूल बस

1930 च्या दशकात अमेरिकेतून पिवळ्या रंगाच्या स्कूल बस सुरू करण्यात आल्या होत्या. कोलंबिया विद्यापीठातील शिक्षकांनी मिळून हा निर्णय घेतला होता.

School Bus Color | ESakal

प्राध्यापकांचे संशोधन

कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक फ्रँक सायर यांनी या विषयावर संशोधन सुरू केले. यावेळी शालेय वाहनांसाठी कोणतेही नियम आणि कायदे नव्हते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बैठक बोलावण्यात आली असून यात शालेय बसचा रंग काय असेल हे ठरविण्यात आले होते.

School Bus Color | ESakal

महत्त्वाची बैठक

या बैठकीला अमेरिकेतून बस बनविणारे उच्चशिक्षित शिक्षक, वाहतूक अधिकारी, अभियंते उपस्थित होते. या सर्वांनी मिळून बसचा रंग कसा असावा हे ठरवलं.

School Bus Color | ESakal

रंग निवडण्याची प्रक्रिया

सभेत एका भिंतीवर अनेक रंग चिकटवून लोकांना एक निवडण्यास सांगण्यात आले. पिवळा आणि केशरी रंग अधिक दिसतो, या निष्कर्षापर्यंत सर्वजण पोहोचले. यावेळी लोकांनी पिवळा रंग निवडला, त्यानंतर स्कूल बसचा रंग पिवळा झाला.

School Bus Color | ESakal

वैज्ञानिक कारण

शास्त्रज्ञांच्या मते पिवळा रंग मानवी डोळ्यांना अधिक सहज दिसतो. हा पिवळा रंग स्पेक्ट्रमच्या शीर्ष स्थानी आहे. याचे कारण म्हणजे डोळ्यात फोटोरिसेप्टर नावाचा एक सेल असतो. याला कोआ असेही म्हणतात.

School Bus Color | ESakal

उठून दिसणारा रंग

मानवी डोळ्यात तीन प्रकारचे शंकु असतात. त्यामुळे डोळ्यांना पिवळा रंग सर्वाधिक दिसून येतो. म्हणून शाळेच्या बस पिवळ्या रंगाच्या ठरविल्या गेल्या, ज्या आजही त्याच रंगामध्ये दिसून येतात.

School Bus Color | ESakal

भारतात किती आणि कोणत्या प्रकारचे तुरुंग आहेत? ही माहिती तुम्ही वाचलीये का?

Indias Prison | Esakal
येथे क्लिक करा