जीन्समधील छोट्या खिशाचा वापर काय? १५० वर्षांपूर्वीचा इतिहास माहितेय का?

Mansi Khambe

तरुणांमध्ये जीन्सची क्रेझ

बदलत्या ट्रेंडनुसार बाजारात अनेक व्हरायटीच्या जीन्स पाहायला मिळतात. वाढती मागणी आणि बदलती फॅशन यानुसार या जीन्स बाजारात आलेल्या आहेत. त्यामुळे जीन्सबद्दलची तरुणांची क्रेझ अधिकच वाढलेली असते.

Jeans Small Pockets | ESakal

जीन्सचा लूक

मॉल आणि दुकानांमधील जीन्सचा लूकसोबत रंग देखील तरुणांना अधिक भावतो. जीन्समुळे व्यक्तीमत्त्व रुबाबदार दिसत असल्यामुळे तरुण तरुणी जीन्सलाच सर्वाधिक प्राधान्य देतात.

Jeans Small Pockets | ESakal

नवीन पॅटर्न

मात्र प्रत्येक नवनवीन पॅटर्नच्या जीन्समध्ये एक कॉमन गोष्ट असते ती म्हणजे 'छोटा खिसा'. जीन्समधील या गोष्टीकडे तुमचं लक्षही गेलं असेल. पण त्याचा कशासाठी उपयोग होतो, हे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

Jeans Small Pockets | ESakal

छोटा खिसा

जीन्समध्ये दिसणाऱ्या या छोट्या खिश्याला वॉच पॉकेट किंवा फोब पॉकेट असेही म्हटलं जातं. घड्याळ, सुट्टे पैसे, चावी किंवा अन्य छोट्या वस्तू सुरक्षित ठेवण्याच्या हेतूने हा छोटा खिसा करण्यात आलेला आहे.

Jeans Small Pockets | ESakal

कारण काय?

19 व्या शतकात हा छोटा खिसा जीन्समध्ये तयार करण्यात आला. त्या काळात पुरुष आपल्या खिशात घड्याळ घेऊन जायचे. त्यामुळे त्यांचे घड्याळ सुरक्षित राहावे म्हणून हा वेगळा छोटा खिसा तयार करण्याची कल्पना आली.

Jeans Small Pockets | ESakal

१५० वर्षांपूर्वीची परंपरा

मात्र आता लोक खिशात घड्याळ ठेवत नसून ते हातात घालतात. परंतु असं असलं तरी दीडशे वर्षापूर्वी रूढ झालेली ही छोट्या खिशाची परंपरा अजूनही सुरू आहे. Jeans Small Pockets

Jeans Small Pockets | ESakal

खिसाचा वापर

जीन्समधील या छोट्या खिश्याचे अनेक फायदे आहेत. या छोट्या खिशात घड्याळ आणि इतर छोट्या गोष्टी सुरक्षित राहू शकतात. बाईकची चावी किंवा तुमच्या ऑफिसच्या लॉकरची चावीही तुम्ही खिशात ठेवू शकता.

Jeans Small Pockets | ESakal

फायदे

तसेच नाणी, एखादं बिल, डॉक्टरांची प्रिस्किप्शनची चिठ्ठी, यूएसबी ड्राईव्ह, पेन ड्राईव्ह आदी गोष्टीही या छोट्या खिशात ठेवता येतात. शिवाय या वस्तू खिश्यातून काढण्यास ही सोप्या असतात.

Jeans Small Pockets | ESakal

मान्सूनचा नेमका अर्थ काय? हा शब्द कुठून आला? जाणून घ्या इतिहास...

Monsoon Meaning | ESakal
येथे क्लिक करा