रोहित कणसे
शरिरासाठी पाणी अत्यंत महत्वाचे मानले जाते, परंतु योग्य वेळी पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. चुकीच्या वेळी पाणी प्यायल्यास शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
आपल्यापैकी बरेच लोक रात्री झोपण्यापूर्वी पाणी पितात, परंतु तुम्हाला माहित आहे का की यामुळे आरोग्याला अनेक हानी होऊ शकतात. चला जाणून घेऊया रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने काय होते?
बऱ्याचदा रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. झोपण्याच्या २ तास आधी पाणी पिणे योग्य मानले जाते.
झोपण्यापूर्वी लगेच पाणी प्यायल्यास रात्री झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो. याचा तुमच्या झोपेवर वाईट परिणाम होऊ शकतो.
रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने तुम्हाला रात्रभर वारंवार लघवी करावी लागू शकते. यामुळे तुमची झोपमोड होऊ शकते.
रात्रीच्या वेळी जास्त पाणी पिऊ नये. त्याचा पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. अन्न खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने हळूहळू आणि कमी प्रमाणात पाणी प्या. झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
रात्रीच्या वेळी थंड किंवा खूपच थंडगार पाणी पिणे टाळावे. थंड पाणी प्यायल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.
रात्री झोपण्याच्या १ तास आधी नेहमी गरम पाणी घ्यावे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासूनही आराम मिळतो.
जर तुम्ही झोपण्याच्या १-२ तास आधी पाणी पिले तर ते तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवते. यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही.
कुंजवनाची सुंदर राणी, रूप तुझे ग अंतर्यामी..!