Mansi Khambe
संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं असून सध्या यामध्ये पहलगाम इथं झालेला दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला असून सभागृहात मोठा गदारोळ झाला.
गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर लोकसभेत सरकारच्या वतीने चर्चेचे नेतृत्व करणार होते. पण, लोकसभेत विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी स्थगित करण्यात आले.
इतकेच नव्हे तर यंदाच्या पावसाळी अधिवेशनातही हिंदी हिंदी भाषेची सक्ती, शक्तीपीठ महामार्ग आणि कर्जमाफी अशा अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ झाल्याचे दिसून आले. यावेळीही अनेकदा कामकाज तहकूब करण्यात आले.
मात्र सभागृहातील कामकाज तहकूब किंवा स्थगित झाल्यानंतर उपस्थित खासदार, मंत्री आणि इतर नेते मंडळी काय करतात, हे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या
माजी खासदार अली अन्वर यांनी सांगितले की, संसदेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर खासदार अनेकदा त्यांच्या स्थायी किंवा निवड समित्यांच्या बैठकांमध्ये सहभागी होतात.
काही खासदार अभ्यास करण्यासाठी, नोट्स तयार करण्यासाठी आणि धोरणांवर संशोधन करण्यासाठी संसद भवनातील चेंबर किंवा ग्रंथालयात जातात.
याशिवाय, खासदार त्यांच्या मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी आणि जनहिताचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी संबंधित मंत्रालयांना भेटतात.
दरम्यान, जेव्हा सभागृहाचे कामकाज तहकूब केले जाते तेव्हा त्यांच्या पक्षाचे किंवा विरोधी पक्षाचे खासदार बसून लोकांशी बोलतात, असेही माजी खासदार अली अन्वर यांनी सांगितले.
तसेच अनेक खासदार या वेळेचा उपयोग त्यांच्या मतदारसंघातील लोकांना भेटण्यासाठी, त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी करतात.