Aarti Badade
कोल्हापुरी भेळ म्हणजे मसाल्याचा तडका आणि चवदार अनुभूती! जाणून घ्या तिची खास गुपित रेसिपी.
मुरमुरे (½ किलो), चिवडा (२ वाट्या), शेव (२ वाट्या), बटाट्याच्या फोडी (१ वाटी), बारीक कांदा, कोथिंबीर (प्रत्येकी १ वाटी) आणि मध्यम आकाराचा १ टोमॅटो फोडी करून घ्या.
१०-१२ हिरव्या मिरच्या, १ इंच आलं, पुदिना, कोथिंबीर, मीठ, आणि कैरीचा कीस किंवा लिंबाचा रस हे सर्व पातळ वाटून झणझणीत चटणी तयार करा.
½ वाटी खजूर, २ टेबलस्पून चिंचेचा कोळ, २ टेबलस्पून गूळ, आणि चवीनुसार तिखट-मीठ एकत्र वाटून गोडसर चवदार चटणी तयार करा.
२ चमचे धने आणि १ चमचा जिरे भाजून त्यांची पूड करून ती गोड चटणीत मिसळा. हाच खास कोल्हापुरी टच!
एका मोठ्या परातीत मुरमुरे, शेव, चिवडा मिसळा. त्यात टोमॅटो, बटाटा, कांदा आणि कोथिंबीर घाला.
थोडा लिंबाचा रस पिळा, कैरीचा कीस मिसळा. आता तयार केलेली गोड आणि तिखट चटणी घालून सगळं व्यवस्थित कालवा.
वरून पुन्हा थोडी शेव आणि चिवडा घाला. यामुळे चव आणि कुरकुरीतपणा दोन्ही वाढतो, भेळेला एक खास टेक्स्चर येते.
ही भेळ म्हणजे मसाल्याचा झणका आणि गोडसर, आंबटपणाचा उत्तम समतोल. प्रत्येक घास तुम्हाला कोल्हापूरची आठवण करून देईल!