Saisimran Ghashi
कोल्हापुरी व्हेज पांढरा रस्सा घरीच बनवायचा आहे?
शुद्ध शाकाहारी कोल्हापुरी चव मिळवा तीही अगदी सहज!
एका नारळाचे दूध,२ ग्लास भाज्यांचे सूप/स्टॉक,४ मिरी,१ इंच दालचिनी,२ लवंग
फ्लॉवर, बटाटा, पातीचा कांदा किंवा तुम्हाला आवडणाऱ्या भाज्या.
भाज्या व मसाले कुकरमध्ये मऊ होईपर्यंत शिजवा.
शिजलेल्या भाज्या मिक्सरमध्ये वाटून घ्या व त्यात नारळाचे दूध मिसळा.
१ चमचा तुपात,अर्धा टीस्पून लवंग + दालचिनी पूड, थोडी वेलची घाला
तूप आधी गरम करा. मग थंड झाल्यावर त्यात मसाले टाका मगच मिश्रण घाला.
रस्सा कोमट करा, पण कधीच उकळू नका.
गरम गरम भातासोबत किंवा चपातीसोबत सर्व्ह करा. कोल्हापुरी चवीचा आस्वाद घ्या