IPL 2024: ठरलं तर! 'हे' चार संघ खेळणार प्लेऑफमध्ये

प्रणाली कोद्रे

बेंगळुरूचा विजय

इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेच्या ६८ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध २७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

RCB vs CSK | X/ChennaiIPL

प्लेऑफचं तिकीट

बेंगळुरूला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी या सामन्यात १८ पेक्षा जास्त धावांनी विजय मिळवणे गरजेचे होते. त्यामुळे बंगळुरूने या विजयासह आयपीएल २०२४ प्लेऑफमधील प्रवेशही पक्का केला.

RCB | X/IPL

चौथा संघ

त्यामुळे आता बेंगळुरू प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ ठरला आहे.

RCB | X/IPL

बेंगळुरूची कामगिरी

बेंगळुरूने १४ सामन्यांमधील ७ सामन्यात विजय आणि ७ सामन्यात पराभव स्विकारत १४ गुणांसह पाँइंट्स टेबलमध्ये चौथा क्रमांक निश्चित केला आहे.

RCB | X/IPL

एलिमिनेटर

त्यामुळे आता त्यांना प्लेऑफमध्ये आधी एलिमिनेटर सामना खेळावा लागणार आहे.

RCB | X/IPL

प्लेऑफमधील चार संघ

बंगळुरूपूर्वी कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.

Rajasthan Royals | X/IPL

कोलकाता नाईट रायडर्स

कोलकाता नाईट रायडर्सने पाँइंट्सटेबलमधील पहिल्या दोन क्रमांकावरील स्थानही निश्चित केल्याने ते पहिल्या क्वालिफायरमध्ये खेळतील.

KKR | Sakal

राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद

तसेच राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी प्लेऑफमधील प्रवेश निश्चित केला असला तरी त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यानंतर त्यांचे पाँइंट्स टेबलमधील दुसरे किंवा तिसरे स्थान निश्चित होईल.

Sunrisers Hyderabad | X/SunRisers

IPL 2024, वानखेडे स्टेडियमवर अन् सूर्यकुमारचा नकोसा विक्रम

Suryakumar Yadav | Sakal