Shubham Banubakode
कोणार्क सूर्य मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. त्याची भव्य रचना आणि ऐतिहासिक महत्त्व यामुळे जगभरातील पर्यटक येथे आकर्षित होतात.
पौराणिक कथांनुसार, मंदिराच्या शिखरावर 52 टन वजनाचा चुंबकीय दगड लावण्यात आला होता. हा चुंबक इतका शक्तिशाली होता की, तो मंदिराच्या संरचनेला आधार देत असे.
या लोहचुंबकामुळे समुद्रामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण होत असे. यामुळेच कोणार्क मंदिर शेकडो वर्षे मजबूतपणे उभे आहे.
मंदिरातील मुख्य चुंबक आणि इतर चुंबकांची रचना अशी होती की, गर्भगृहातील सूर्यदेवाची मूर्ती हवेत तरंगत असल्याचे दिसत होते.
आधुनिक काळात या चुंबकाची शक्ती समस्या ठरली. त्याची प्रचंड चुंबकीय शक्ती समुद्रातील जहाजांना मंदिराकडे खेचत होती, ज्यामुळे इंग्रजांनी हा चुंबक काढून टाकला.
मंदिराची रचना चुंबकीय संतुलनावर आधारित होती. चुंबक काढल्यानंतर मंदिराचे संतुलन बिघडले, ज्यामुळे अनेक भिंती आणि दगड कोसळले.
कोणार्क मंदिराची कल्पना सूर्याच्या रथाप्रमाणे आहे. या रथाला 12 चाके असून, त्यावर अप्रतिम कोरीव काम केलेले आहे, जो कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना आहे.
हे मंदिर ओडिशाच्या पुरी जिल्ह्यात चंद्रभागा नदीच्या किनारी वसलेले आहे. त्याचे स्थान आणि नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते.
कोणार्क मंदिराच्या गर्भगृहात सूर्यदेवाचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य फार कमी लोकांना मिळते, ज्यामुळे येथील भक्तीचा अनुभव अधिक खास होतो.
कोणार्क सूर्य मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही, तर भारताच्या समृद्ध इतिहासाचा आणि स्थापत्यशास्त्राचा एक जिवंत पुरावा आहे.