संतोष कानडे
१३–१४व्या शतकात कुणबी ही मुख्यत्वे शेती करणारे आणि स्थानिक गावकऱ्यांमध्ये सक्रिय जमात होती.
१५व्या शतकाच्या अखेरीस बहामनी साम्राज्याच्या दस्तऐवजांमध्ये शस्त्रधारी गटांसाठी ‘मराठा’ हा शब्द दिसतो.
१६व्या शतकात काही कुणबी गट स्थानिक लष्करी संघटनांमध्ये सामील होतात आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवतात.
१६व्या शतकाच्या मध्यार्धात कुणबी +योद्धा गटाचे एकत्रीकरण होते; मराठा शब्द व्यापक वापरात येतो.
१६व्या शतकाच्या अखेरीस शिवाजी महाराजांच्या युगात मराठा ओळख सामाजिक आणि लष्करी संदर्भात स्थिर होते.
१९व्या शतकात ब्रिटिशांनी प्रशासनात मराठा शब्द वापरला, कुणबी-योद्धा गटांचे ऐतिहासिक संदर्भ नोंदवले.
२०–२१व्या शतकात कुणबी समाज मराठा ओळखीचा पाया मानला जातो, राजकीय आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून ही ओळख टिकलेली आहे.
सध्या राज्यामध्ये मराठा समाजाकडून कुणबी आरक्षणासाठीची मागणी जोर धरलेली आहे. राज्य शासनानेही एक जीआर काढलेला आहे.
मराठ्यांना पुराव्यांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यासंबंधीचा जीआर सरकारने काढलेला आहे. त्यामुळे राज्यात मराठा समाजाला मोठ्या आशा निर्माण झालेल्या आहेत.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, यासाठी ओबीसी नेत्यांनी मोर्चेबांधणी केलेली आहे.