Payal Naik
राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे हस्तांतर झाले आहेत.
ज्या महिलांनी १० ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरले होते आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले होते त्यांना आतापर्यंत दोन हफ्ते आले आहेत
अशा महिलांना जुलै आणि ऑगस्टचे मिळून ३००० रुपये आले आहेत.
आता त्यानंतर फॉर्म भरलेल्या म्हणजेच ३१ ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरणाऱ्या महिलांना एकूण तीन हफ्ते येणार आहेत.
अशा महिलांना ४५०० रुपये येणार आहेत. तर आधी दोन हफ्ते मिळालेल्या महिलांना १५०० रुपये येणार आहेत.
या योजनेचा पहिला हफ्ता १४ ते १७ ऑगस्ट च्या मध्ये देण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, आता पुढील हफ्ता हा एका महिन्याच्या कालावधीने म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या १४ ते १७ तारखेच्या मध्येच मिळण्याची शक्यता आहे.
३१ ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरणाऱ्या महिलांच्या फॉर्मची पडताळणी करण्यासाठी लागणारा वेळ पकडून हा हफ्ता १५ तारखेच्या आसपास मिळणार असल्याचं सांगण्यात येतंय.