Mansi Khambe
गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेशभक्तांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.
Lalbaugcha Raja Darshan
ESakal
यंदा लालबागचा राजा गणेशोत्सवाचे ९३वे वर्ष साजरे होत असून, १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशोत्सव पार पडणार आहे.
Lalbaugcha Raja Darshan
ESakal
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक येथे येतात. त्यामुळे लालबाग परिसरात गणेशभक्तांची मोठी गर्दी दिसून येते.
Lalbaugcha Raja Darshan
ESakal
त्यामुळे जर तुम्हालाही लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायचे असेल आणि गर्दी टाळायची असेल तर आठवड्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी सकाळची वेळ तुलनेने सोयीची ठरू शकते.
Lalbaugcha Raja Darshan
ESakal
साधारणपणे दर्शन पहाटे ५ वाजता, तर मुखदर्शन आणि चरणस्पर्शाच्या रांगा सकाळी ६ वाजता सुरू होतात. मात्र, उत्सवातील गर्दी आणि व्यवस्थापनानुसार वेळेत बदल होऊ शकतो.
Lalbaugcha Raja Darshan
ESakal
विशेषतः शनिवार-रविवार, संध्याकाळची वेळ आणि गणेशोत्सवाचे शेवटचे दिवस गर्दीचे ठरू शकतात. त्यामुळे गर्दी टाळायची असल्यास या वेळा शक्यतो टाळणे फायदेशीर ठरेल.
Lalbaugcha Raja Darshan
ESakal
तसेच मुंबईत प्रत्यक्ष येणे शक्य नसणाऱ्या भाविकांसाठी ऑनलाइन दर्शन घेता येणार आहे.
Lalbaugcha Raja Darshan
ESakal
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाताना रांगेत बराच वेळ उभे राहावे लागू शकते, त्यामुळे त्याची तयारी ठेवावी. मोठ्या बॅगा, अनावश्यक वस्तू किंवा मौल्यवान वस्तू सोबत नेणे टाळावे.
Lalbaugcha Raja Darshan
ESakal
तसेच, घरातून निघण्यापूर्वी लालबागच्या राजाच्या अधिकृत अपडेट्सवर दर्शनाची वेळ, रांगेची व्यवस्था आणि वाहतूक नियोजनाची माहिती तपासावी.
Lalbaugcha Raja Darshan
ESakal
Railway Seats
ESakal