Yashwant Kshirsagar
फळे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण काही फळांबद्दल आपण अनभिज्ञ असतो,
अशाच एका दुर्मिळ आणि वर्षातून केवळ दोन महिनेच मिळणाऱ्या बहुगुणकारी फळाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
भोकर या फळाला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. महाराष्ट्र, दक्षिण, गुजरात आणि राजस्थानमधील लोक ते त्यांच्या जेवणात वापरतात.
भोकर हे फळ प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फायबर, लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरस सारख्या पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे, जे शरीर मजबूत करण्यास मदत करतात.
भोकरात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे पचन सुधारण्यास मदत करतात.
भोकर खरुज, खाज आणि इतर त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरता येते.
भोकर यकृत स्वच्छ करण्यास आणि निरोगी ठेवण्यास मदत करते.
या फळात उच्च रक्तदाबविरोधी गुणधर्म आहेत जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात.
भोकर फळ आणि पाने सांधेदुखी कमी करण्यास मदत करू शकतात.
दातदुखी, ताप आणि खोकला तसेच घसा खवखवणे यासंह इतर आजारांवर देखील भोकराचे फळ गुणकारी आहे.
घड्याळ नव्हते तेव्हा आपल्या पूर्वजांना वेळ कशी कळत असे ? जाणून वाटेल आश्चर्य