संतोष कानडे
भारत स्वतंत्र झाल्यानंतर निजाम संस्थान खालसा करण्यात आलं. शेवटच्या निझामाचे नातू मुकर्रम जाह यांनी चार हजार कोटी रुपयांची संपत्ती गमावली होती.
२०२३ मध्ये मुकर्रम जाह यांचं निधन झालं, त्यावेळी त्यांच वय ८९ वर्षे होतं. त्यांचा मृत्यू अनातोलियामध्ये तीन बेडरुमच्या फ्लॅटमध्ये झाला.
हैदराबादचे आठवे निजाम म्हणून मुकर्रम जाह १९६७ गादीवर बसले होते. त्यांना आजोबांकडून शेकडो किलो सोनं, हिरे, १०-१५ महाल, मुघलकालीन कलाकृती मिळाल्या होत्या.
मुकर्रम जाह यांनी मृत्यूपर्वी साधारण ४ हजार कोटी रुपयांची संपत्ती उडवली किंवा गमावली, अशी ऐतिहासिक माहिती आहे.
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा हैदराबाद संस्थान हे देशातील सर्वात मोठे संस्थान होते. कितीतरी देशांपेक्षा या संस्थानचं उत्पन्न जास्त होतं.
१९४९ साली न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, निजामाची एकूण संपत्ती २ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी असण्याची शक्यता होती.
भारतीय स्टेट बँकेने दिलेल्या आकडेवारीनुसार निजामाकडे ४ हजार कोटींच्या आसपास संपत्ती असेल, असं सांगितलं होतं.
मुकर्रम जाह यांनी परदेशात अनेक जमिनी घेतल्या, सोन्याच्या खानीही घेतल्याची नोंद आहे. परंतु संस्थानचा खर्च वाढलेला होता.
शाही खर्च, हजारो कर्मचारी, महागड्या गाड्या आणि मुकर्रम यांचा स्वतःचा खर्च यामुळे ते खचत चालले होते. शिवाय भारत सरकारने निजाम ट्रस्टच्या दागिन्यांची विक्री परदेशात करण्याला रोख आणली होती. ते दागिने सरकारने नंतर कमी दरात खरेदी केले.
त्यांच्या पाचशेपेक्षा जास्त नावतांना संपत्तीचं समान वाटप करण्याचे आदेश आंध्र प्रदेश कोर्टाने दिले होते. मुकर्रम जाह यांच्याच बहिणीने हा खटला चालवला होता.
२०१२ नंतर शेवटचे निजाम मुकर्रम जाह कधीही हैदराबादेत आलेले नव्हते. ते तुर्कस्थानात रहायचे. २०२३ मध्ये त्यांच निधन झाल्यानतंर त्यांचं पार्थिव हैदराबादेत आणलं गेलं.