Anushka Tapshalkar
प्रामुख्याने स्वयंपाकात विशेषतः तंदूरमध्ये, नैसर्गिक रंग म्हणून या मुळांचा वापर केला जातो. तसेच आयुर्वेदानुसार केस आणि त्वचेसाठी हा एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे.
रतनजोतची मुळे , खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेल, तेल साठवण्यासाठी स्वच्छ काचेची बाटली
रतनजोतची मुळे पाण्याने स्वच्छ धुवा आणि त्यांना नीट वाळवा, जेणेकरून त्यांची सगळी धूळ आणि माती निघून जाईल.
एका पॅनमध्ये मध्यम आचेवर तुमच्या आवडीचे तेल ३-५ मिनिटांसाठी फक्त गरम करून घ्या. ते उकळू नका.
आता गरम झालेल्या तेलात साफ करून वाळवलेली रतनजोतची मुळे टाका आणि हलक्या हाताने ढवळा.
माध्यम आचेवर हे मिश्रण २०-२५ मिनिटे उकळा. यामुळे मुळातील पोषकतत्वे तेलातील पूर्णपणे शोषली जातील.
जसेजसे मिश्रण उकळत जाईल तसेतसे तेल गडद लाल रंगाचे होईल. हे दर्शवते की रतनजोतचे गुणधर्म तेलात योग्यरित्या मिसळले आहेत.
तेल व्यवस्थित उकळल्यावर गॅस बंद करा आणि तेल पूर्णपणे थंड होऊ द्या.
बारीक चाळणीने किंवा मलमलच्या कापडाने हे तेल गाळून घ्या, जेणेकरून मुळाचे तुकडे त्यात राहणार नाही.
गाळलेले तेल आता हवाबंद काचेच्या बाटलीत भरून ठेवा. नंतर ही बाटली अंधाऱ्या आणि थंडगार ठिकाणी ठेवा.
केस गळती कमी करण्यासाठी आणि केसांच्या वाढीला चालना मिळण्यासाठी या तेलाने आठवड्यातून दोनदा स्कॅल्पचा मसाज करा.