Pranali Kodre
तुळ ही सातवी रास असून शुक्र ग्रहाच्या अधिपत्याखाली येते.
तुळ ही रास सौंदर्य, प्रेम आणि समतोल यासाठीही ओळखली जाते. या व्यक्ती रोमँटिकही असतात.
या राशीच्या व्यक्ती समता आणि संवादाचा आग्रह धरते, त्यांचं प्रेम सौंदर्य आणि सुसंवादावर अधारित असते.
तुळ राशीच्या व्यक्तींना समजूतदार, आकर्षक आणि सुसंस्कृत जोडीदाराची अपेक्षा असते.
तुळ राशींच्या लोकांना स्वातंत्र्य आणि स्वेच्छेने राहण्याची आवड असल्याने त्यांचे वैवाहिक जीवन फारसे सोपे नसते.
बऱ्याचदा त्यांचे साथीदारासोबत ताळमेळ बसत नाही.कारण त्यांना नातं समतोल असावं असंच वाटतं. त्यांना वर्चस्व किंवा एकतर्फी प्रेम सहन होत नाही.
तुळ राशीच्या व्यक्ती तशा सहनशील असतात, पण त्यांना नात्यात न्याय आणि समता नसेल, तर ते आवडत नाही आणि ते नातं तोडण्याचा विचार देखील करू शकतात.
तुळ राशीसाठीसाठी मिथुन, कुंभ, धनू आणि सिंह या राशी अनुकूल आहे, या राशींच्या जोडीदारासोबत त्यांचे सहजीवन अधिक आनंदायक ठरू शकते.
तुळ राशीच्या व्यक्तींनी मीन राशीच्या व्यक्तींशी विवाह टाळावा.
वैवाहिक सौख्यसाठी तुळ राशीच्या व्यक्तींनी कुलस्वामिनीची उपासना करावी.