सकाळ डिजिटल टीम
जगात एक असं गाव आहे जिथं गावकरी विवस्त्र राहतात. ९० वर्षांपेक्षा जास्त अशी जुनी आणि अनोखी परंपरा आहे.
इस्युट रिचर्डसन नावाच्या व्यक्तीनं १९२९ मध्ये हा शोध लावला. त्यानंतर तो इथंच स्थायिक झाला.
गावात अनेक सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम, संपन्न लोक आहेत. इथं मुलं, महिला, पुरुष आणि वृद्ध सगळेच विवस्त्र राहतात.
कपडे घालणं हे पारतंत्र्य असून विवस्त्र राहिल्यानं स्वातंत्र्य असल्याचं वाटतं असं स्थानिकांचं म्हणणं आहे.
गावात येणाऱ्या पाहुण्यांना आणि पर्यटकांनाही हा नियम पाळावा लागतो. तरच त्यांना गावात प्रवेश मिळतो.
गावातले लोक शहरात किंवा कामानिमित्त बाहेर गेले तर ते कपडे घालतात. मात्र गावात परतताच पुन्हा विवस्त्र होतात.
हिवाळ्याच्या दिवसात थंडीपासून वाचण्यासाठी केवळ कपडे घालण्याची मुभा आहे. इतर वेळी मात्र ते विवस्त्रच असतात.
ब्रिटनच्या हर्टफोर्डशायर इथं स्पीलप्लॅट्झ नावाचं हे गावं आहे. तिथं कपडे न घालण्याची परंपरा आजही पाळली जाते.