चेन्नईविरुद्ध 'या' सलामीवीरांनी केली आहे सर्वात मोठी भागिदारी

सकाळ डिजिटल टीम

आयपीएल २०२४ चा ३४ वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये खेळला गेला. सामन्यात लखनौने चेन्नईला ८ विकेट्सने पराभूत केले.

LSG VS CSK | sakal

सामन्यात लखनौकडून सलामीला आलेल्या डिकाॅक आणि राहुलने पहिल्या विकेटसाठी १३४ धावांची भागिदारी करत चेन्नईविरुद्ध मोठी भागिदारी करण्याच्या यादीत प्रवेश केला आहे.

sakal

चेन्नईविरुद्ध सर्वात मोठी सलामीची भागिदारी करण्याच्या बाबतीत अजिंक्य रहाणे आणि शेन वाॅटसन पहिल्या क्रमांकावर आहेत. त्या दोघांनी २०१५ मध्ये राजस्थानसाठी १४४ धावांची भागिदारी केली होती.

sakal

तसेच शिखर धवन आणि पृथ्वी शाॅ या यादीत दूसऱ्या क्रमांकावर आहेत. त्या दोघांनी २०२१ मध्ये दिल्लीसाठी चेन्नईविरुद्ध १३८ धावांची भागिदारी केली होती.

sakal

आता तिसऱ्या स्थानावर लखनौची डिकाॅक आणि राहुल ही जोडी आली आहे. त्यांनी १३४ धावांची भागिदारी केली आहे.

sakal

तसेच चौथ्या स्थानावर आहेत ग्रॅमी स्मिथ आणि स्वप्निल असनोडकर. या दोघांनी २००८ साली राजस्थान राॅयल्ससाठी १२७ धावांची खेळी खेळली होती.

sakal

क्विंटन डीकाॅक आणि ईशान किशन या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत, या दोघांनी २०२० साली चेन्नईविरुद्ध मुंबईसाठी ११६ धावांची भागिदारी केली होती.

sakal

धवन आणि वाॅर्नरने २०१४ साली हैदराबादसाठी ११६ धावांची भागिदारी केली होती, ते सर्वाधिक भागिदारी करण्याच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहेत.

sakal

कढीपत्ता खाण्याचे 'हे' होतात फायदे

curry leaves | sakal