Monika Shinde
दरवर्षी १९ एप्रिल रोजी जागतिक यकृत दिन साजरा केला जातो. यकृताचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी रोजच्या जेवणात योग्य आहार घेणं खूप गरजेचं आहे. चला तर जाणून घेऊया कोणते पदार्थ समावेश करावे.
ग्रीन टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, विशेषतः कॅटेचिन्स जे यकृतातील चरबी कमी करण्यास मदत करते.
कॉफीमध्ये असलेली अँटीऑक्सिडंट्स आणि जैवसक्रिय संयुगे यकृतातील सूज कमी करण्यात मदत करतात, तसेच लिव्हर सिरोसिससारख्या गंभीर आजारांचा धोका कमी करतात.
हळदीत असलेलं कर्क्युमिन हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असून, ते यकृताची डिटॉक्स प्रक्रिया सक्षम करतं आणि यकृताच्या पेशींना संरक्षण प्रदान करतं.
बेरीजमध्ये अँथोसायनिन्स नावाचं प्रभावी अँटीऑक्सिडंट आढळतं, जे यकृताच्या पेशींचं संरक्षण करतं आणि सूज कमी करण्यास मदत करतं.
ब्रोकोली, फुलकोबी, बटाटा, कोबी आणि ब्रेसल्स स्प्राउट्स यांसारख्या भाज्या यकृतासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. या भाज्यांमध्ये 'इंडोल' नावाचे संयुगे असतात, जे यकृतातील चरबीचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात.
अखरोट, बदाम आणि काजू यांसारख्या नट्समध्ये हेल्दी फॅट्स, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन E असतात. अखरोट विशेषतः यकृताच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे, कारण यामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स आणि ग्लूटाथायन असतो.
सॅल्मन, टूना आणि मॅकरल यांसारख्या फॅटी फिशमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स असतात, जे यकृतातील सूज आणि चरबीचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात.
द्राक्षांमध्ये रेस्व्हेराट्रोल नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे यकृतातील सूज कमी करण्यास मदत करते. हे विशेषतः नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिजीज (NAFLD) असलेल्या व्यक्तींमध्ये उपयुक्त आहे.