Anushka Tapshalkar
मूग डाळ ही फायबर आणि प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे, जी वजन कमी करण्यास मदत करते.
तुम्ही सुद्धा वाजन कमी करत असाल किंवा तुम्हाला काही पौष्टिक बनवायचे असेल तर ही कमी कॅलरीयुक्त मूग डाळ चाटची रेसिपी तुमच्यासाठीच आहे.
मूग डाळ, पाणी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची,बारीक चिरलेला टोमॅटो, बारिक चिरलेली काकडी, कोथिंबीर, कैरी (पर्यायी), डाळिंबाचे दाणे (पर्यायी), शेव, लिंबू, मीठ आणि मिरपूड
रात्री एका भांड्यात तुम्हाला हवी तेवढी मूग डाळ स्वच्छ पाण्यात धुवून भिजत ठेवा.
सकाळी या भिजवलेल्या मूग डाळीमधले पाणी उठून १५ मिनिटांसाठी ही मूग डाळ वाफपवून घ्या.
मूग डाळ वाफवून झाली की थोडावेळ थंड करायला ठेवा आणि नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला.
आता त्यात चवीनुसार मीठ, मिरपूड आणि लिंबाचा रस घाला आणि चाट व्यवस्थित मिक्स करा.
हा चाट अधिक चवदार बनवण्यासाठी त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, कैरीचे तुकडे, डाळिंबाचे दाणे आणि वरून थोडी शेव भुरबूरा. तुमचं मूग डाळ चाट रेडी आहे.
हे चविष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर चाट सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी योग्य पर्याय आहे.