Yashwant Kshirsagar
भारतात शहर असो वा गाव, स्वयंपाकासाठी LPG ही अत्यावश्यक गरज आहे. लाखो कुटुंबे रोज गॅस वापरतात, त्यामुळे एजन्सीचा व्यवसायाला नेहमीच मागणी राहते. राहतो. स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा एक सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय आहे.
LPG Dealership India
esakal
Indane (IOCL), Bharat Gas (BPCL) आणि HP Gas (HPCL) या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या वेळोवेळी नवीन LPG डिस्ट्रीब्यूटरशिपसाठी जाहिराती काढतात. त्या www.lpgvitarakchayan.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होतात.
LPG Dealership India
esakal
भारतीय नागरिक असणे अनिवार्य, किमान १०वी उत्तीर्ण, वय २१ ते ६० वर्षे,गॅस गोदाम आणि कार्यालयासाठी स्वतःची किंवा लांब मुदतीची भाड्याची जमीन असणे आवश्यक, रस्त्याची कनेक्टिव्हीटी चांगली असावी.
LPG Dealership India
esakal
एजन्सीसाठी PESO नियमांनुसार गोदाम (Godown) बांधणे गरजेचे आहे. शहर/रुरबनसाठी साधारण २५m × ३०m आकाराची जमीन, ग्रामीण भागात थोडी कमी. जमीन मालकीची किंवा १०+ वर्षांची लीजवर असावी. अग्निशमन विभाग आणि स्थानिक महानगरपालिकेकडून NOC घेणे आवश्यक
LPG Dealership India
esakal
अधिकृत साइट lpgvitarakchayan.in वर रजिस्टर करा,जाहिरातीनुसार ऑनलाइन अर्ज भरा,अर्ज फी भरली जाते. अर्जांची छाननी होते, नंतर ड्रॉ ऑफ लॉट्स (लकी ड्रॉ) ने निवड होते.
LPG Dealership India
esakal
ड्रॉमध्ये नाव आल्यानंतर कंपनी अधिकारी जमीन, कागदपत्रे आणि इतर गोष्टींची फिजिकल व्हेरिफिकेशन करतात. सर्व काही ठीक असल्यास Letter of Intent (LOI) मिळते. नंतर गोदाम बांधकाम, लायसन्स आणि व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळते.
LPG Dealership India
esakal
शहर आणि गावानुसार खर्च बदलतो. साधारणपणे १५ लाख ते ३० लाख रुपये काही ठिकाणी १० ते २५ लाख पर्यंत). यात मुख्य खर्च, सुरक्षा डिपॉझिट गोदाम आणि कार्यालय बांधकाम,डिलिव्हरी वाहन,फर्निचर आणि वर्किंग कॅपिटल
LPG Dealership India
esakal
मुख्य उत्पन्न प्रति सिलिंडर कमिशन वरून येते (साधारण ₹४०-६० प्रति १४.२ किलो सिलिंडर). ५,००० ते १०,००० सक्रिय ग्राहक असतील तर सर्व खर्च वजा करून ₹१.५ लाख ते ₹३ लाख प्रति महिना नफा शक्य आआहे या शिवाय शेगडी विक्री, सर्व्हिसिंग आणि नवीन कनेक्शनमधून देखील . अतिरिक्त कमाई होते.
LPG Dealership India
esakal
फक्त www.lpgvitarakchayan.in सारख्या अधिकृत साइटवरच अर्ज करा.खोट्या जाहिराती आणि फसवणूक टाळा.आधार, पॅन, जमीन कागदपत्रे, बँक स्टेटमेंट तयार ठेवा. व्यवसाय सुरू झाल्यानंतर सुरक्षा नियम (PESO लायसन्स) काटेकोरपणे पाळा
LPG Dealership India
esakal
एकदा व्यवसाय सुरू झाला की ग्राहक कधीच कमी पडत नाहीत. योग्य नियोजन, चांगली सेवा आणि विस्तार केल्यास हा व्यवसाय पिढ्यानुपिढ्या चालू शकतो.
LPG Dealership India
esakal
Amazon Boiling River
esakal