Maha Kumbh : गोल्डन बाबा! अंगावर ६ कोटींचं सोनं; म्हणतात, हा दिखावा नाही

सूरज यादव

गोल्डन बाबाची चर्चा

महाकुंभ मेळ्यात अनेक साधु संत त्यांच्या आगळ्या वेगळ्या तपश्चर्येमुळे चर्चेत आहेत. तर एक बाबा अंगावर असलेल्या ६ कोटींच्या सोन्यामुळे लक्ष वेधून घेतायत.

Golden Baba Wears 6 Crore Worth of Gold | Esakal

अंगावरील कोट्यवधींचं सोनं

गोल्डन बाबा अशी ओळख असलेल्या एस के नारायण गिरी यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महाकुंभ मेळ्यात ते सहभागी झाले आहेत.

Golden Baba Wears 6 Crore Worth of Gold | Esakal

मूळचे केरळचे

एस के नारायण गिरी हे मूळचे केरळचे आहेत. निरंजन आखाड्याशी जोडलेले हे गोल्डन बाबा सध्या दिल्लीत राहतात.

Golden Baba Wears 6 Crore Worth of Gold | Esakal

साडे सहा किलो सोनं

गोल्डन बाबांच्या अंगावर ६.५ किलो सोनं आहे. याची किंमत आजच्या बाजारभावानुसार जवळपास ६ कोटी रुपये इतकी आहे.

Golden Baba Wears 6 Crore Worth of Gold | Esakal

हातात सोन्याची छडी

सोन्याच्या अंगठ्या, कडे, घड्याळ आणि इतकंच नव्हे तर हातात सोन्याची छडीसुद्धा आहे. या छडीवर देवीदेवतांचे लॉकेट आहेत.

Golden Baba Wears 6 Crore Worth of Gold | Esakal

दागिन्यांमध्ये अध्यात्मिक ताकद

सोनं हे साधनेशी जोडलेलं असून प्रत्येक दागिन्यात अध्यात्मिक ताकद असल्याचं गोल्डन बाबा यांनी म्हटलंय. एस के नारायण गिरी यांचं वय ६७ वर्षे इतकं आहे.

Golden Baba Wears 6 Crore Worth of Gold | Esakal

शिक्षण क्षेत्रात काम

निरंजनी आखाड्याचे अध्यक्ष रवींद्र पुरी महाराज यांनी एस के नारायण गिरी यांना दीक्षा दिली. गोल्डन बाबा शिक्षण क्षेत्रातही काम करत आहेत.

Golden Baba Wears 6 Crore Worth of Gold | Esakal

मोबाईल कव्हरही सोन्याचं

गोल्डन बाबांकडे सोन्याची ६ लॉकेट आहेत. या लॉकेटपासून किमान २० चेन तयार होतील. त्यांच्या मोबाईलचा कव्हरही सोन्याचा आहे.

Golden Baba Wears 6 Crore Worth of Gold | Esakal

हे दिखाव्यासाठी नाही

गोल्डन बाबा म्हणतात की माझी प्रत्येक गोष्ट साधनेशी जोडलेली आहे. सोन्यानं मढवलेलं रूप हे दिखाव्यासाठी नाही तर अध्यात्मिक जीवन आणि गुरुबद्दलच्या श्रद्धेचं प्रतिक आहे.

Golden Baba Wears 6 Crore Worth of Gold | Esakal

IIT बाबा संन्यास घेण्याआधी कसा दिसायचा?

abhay singh old photo | esakal
इथं क्लिक करा